शिवसैनिक राजुरा तालुक्यात भविष्यात होणाऱ्या निवडणुकीचा निकाल ठरवणार:- शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे. #rajura

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी अध्यक्षीय भाषण केले. राजुरा विधानसभा ही ऐके काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, परंतु मध्यंतरी काळात राजुरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेत दुफळी निर्माण झाली परंतु ती दुफळी आता संपूर्ण बाजूला ठेवून आजी माजी पदाधिकारी यांनी मिळून पक्षासाठी काम करून संपूर्ण तालुक्यात शिवसेनेच्या शाखा स्थापित करून संपूर्ण ग्रामीण भागात आणि शहरात शिवसैनिक तयार करण्याचे आदेश दिले.
येणाऱ्या निवडणुका ह्या सामान्य शिवसैनिकांच्या निवडणुका आहे. जे आता पदाधिकारी आहेत. त्यांच्या कडून कोणतीही हलगर्जीपणा सहन करून घेणार नाही, जर पदाधिकारी आपल्या पदाला न्याय देऊ शकत नसेल तर स्वतः समोर येऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊन नवीन व्यक्तींना पदाधिकारी नेमून मार्गदर्शन करावे.
भविष्यात येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये निकाल चांगले येतील आणि शिवसेनेच्या बालेकिल्ला अभेद राहील.
मेळाव्याला राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, कुसुम उदार माजी जिल्हा संघटिका महीला आघाडी, वासुदेव चापले राजुरा तालुका प्रमुख शिवसेना, बल्लारपूर तालुका समन्वयक प्रदीप गेडाम, स्वप्नील काशीकर, शहर प्रमुख निलेश गंपावार, शहर समन्वयक बबलू चौहान, तसेच आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)