Top News

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध. #Maharashtragovernment


राज्य सरकारनं काढली नवी नियमावली.
मुंबई:- देशासह राज्यात कोरोनानंतर आता कुठे सर्व काही पूर्वपदावर येत होतं. सर्व काही नियमित झालं होतं. तेवढ्यात जुन्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही सावध भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने खबरदारी म्हणून पुन्हा काही निर्बंध लावले आहेत. सरकारने या संदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे.
काय आहे नियमावली?

रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल. म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही.

महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक
सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल.

मास्क घातलेला नसेल तर ५०० रुपये दंड.

दुकानात ग्राहकाकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड, तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला ५० हजार दंड.

राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड.
भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ २५ टक्के लोकांनाच उपस्थिती.

टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड तसेच वाहन मालकासही ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल.

किमान ६ फूट अंतर राहील असं सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई.
केंद्राचं सर्व राज्यांना पत्र

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे खबरदारी घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट केले आहे. सरकारने पत्र लिहून राज्यांना आदेश दिलेत की, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करा. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करा. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने