जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सहा वर्षाच्या मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या आरोपीस १४ वर्षाची शिक्षा #Chandrapur #Tyranny

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपुर:- पोलीस स्टेशन दुर्गापुर हदीतील मेजर गेट जवळ वैद्य नगर दुर्गापुर येथे सहा वर्षाच्या मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या आरोपीस दि. २७/११/२०२१ रोजी मा. अन्सारी मॅडम, जिल्हा न्यायाधीश, कोर्ट २ रे चंद्रपुर यांनी १४ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

पोलीस स्टेशन दुर्गापुर हददीतील मेजर गेट जवळ वैद्य नगर दुर्गापुर येथे फिर्यादीची सहा वर्षाची मुलगी खेळत असता अनोळखी आरोपी इसमाने तिला खावु घेवुन देण्याचे बहानाने आपले सोबत घेवून गेला व दुकाना मधुन खावु घेवुन दिला व तिला नॅशनल शाळेजवळ नेवून तिचेवर लैंगीक अत्याचार केला.

पिडीत मुलीची तब्येत खराब झाल्याने ताबडतोब आईने पिडीत मुलीला दवाखान्यात घेवुन गेल्याने वैद्यकीय तपासणी रिपोर्ट वरुन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे अप.क. १८२/२०१७ कलम २), (I) (J),(M) भादंवि सहकलम ६ बा.लै. अ. अधीनियम २०१२ सहकलम ३(१)(W)(i)(ii)(३)(२) V अ.जा.ज.अ.प्र. कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा तपासात घेतल्यानंतर उपविभागीय पोलीस अधीकारी सुशिलकुमार नायक यांनी आरोपी निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक २७/११/२०२१ रोजी आरोपी नामे शेख रहेमान याकूब शेख, वय ५० वर्षे, रा. वैद्य नगर तुकुम चंद्रपुर यास कलम ३६३ मध्ये ४ वर्ष कारावासाची शिक्षा व १००० / - रु दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा, ३७६ (२), (१) भादवी. आणि ५ (१), (अ) बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२, कलम ६ प्रमाणे १४ वर्षे कारावासाची शिक्षा आणि २००० / - रु दंड व दंड न भरल्यास १ वर्ष कारावासाची शिक्षा सर्व शिक्षा एका वेळेस भोगावी लागणार अशी शिक्षा मा. अन्सारी मॅडम, जिल्हा न्यायाधीश, कोर्ट २ रे चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे ॲड. श्री. देगाकार, सरकारी अभियोक्ता, चंद्रपुर आणि कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा. संजय उमाटे, पोलीस स्टेशन दुर्गापुर यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत