मॅजिक बस फाऊंडेशन व जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने बालक दिवस साजरा. #Chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- मॅजिक बस फाऊंडेशन व जिल्हा परिषद शाळ्यांच्या वतीने आज 14 नोव्हेबर 2021 रोज रविवार ला बालक दिवसाचे औचित्य साधुन चंद्रपूर तालुक्यामधील विविध गावांमध्ये बालक दिवस साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी बालक दिवस साजरा केला जातो. या कोरोनाच्या महामारित आज चा बालक स्वतः साठी व देशाच्या भविष्यासाठी किती महत्वाचा आहे? हे विद्यार्थ्याना सांगण्यात आले. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळामध्ये चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा आयोजित केली.यामध्ये शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले .आणि मॅजिक बस फाऊंडेशन चे वरिष्ठ जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात,आणि तालुका व्यवस्थापक मा. नितेश मालेकर, शाळा सहाय्यक अधिकारी कु. नालंदा बोथले .समूदाय समन्वयक प्राजक्ता दुर्योधन, मीनल दोडके, प्रेम जरपोतवार,हेमलता पेंदाम तसेच समस्थ विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.
बालक दिनाचे महत्त्व.

बालदिन साजरा करताना आपण अर्थातच चाचा नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. बालदिनाच्या निमित्ताने आपणांपैकी प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची आठवण राहते.
भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान होते पंडित नेहरू. बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्‍या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो.