Click Here...👇👇👇

सिंदेवाही तहसीलदाराच्या मनमानी व अन्यायकारक कारभारा विरोधात पँथर चे बेमुदत आमरण उपोषण. #Chandrapur

Bhairav Diwase

उपोषण कर्त्याच्या मागण्या तात्काळ पुर्ण करुन तहसीलदारांना निलंबित करा:- रुपेश निमसरकार
चंद्रपूर:- जिल्ह्यातील सिंदेवाही तहसील कार्यालयात सर्व सामान्य माणसाची गळचेपी होते. पैशाच्या जोरावर अशक्य कामे शक्य होतात. सामान्य माणसांचे शक्य काम अशक्य होतात. हे प्रत्यक्षात उपोषण कर्ता सुनील गेडाम त्यांच्या शेतीच्या फेरफार प्रकरणावरून स्पष्ट अनुभवायला मिळते आहे. मागील आठ महिन्यापासून ते आजपर्यंत शेतीच्या फेरफार संबंधित कामाकरिता वारंवार तहसील कार्यालय, एसडीओ कार्यालया पर्यंत चक्करा माराव्या लागल्यात. त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील एक जीवनावश्यक वस्तू कमी खरेदी करून ते पैसे त्यांनी त्यांच्या या कार्यालयाच्या फेरफटका मारण्यात खर्ची घातले.

मात्र अधिकारी वर्ग त्यांना तुमची शेतजमीन ही शासन जमा करू असे धमकवायचे. तसेच त्यांचे कागदोपत्री व्यवहारात तहसीलदाराने स्वतःच्या कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्यांचा फेरफार हा प्रलंबित असल्याने त्यांनी ऑल इंडिया पँथर सेनेकडे त्यांनी आपल्यावर झालेला अन्याय कथन केला. त्यांच्यावर झालेला हा अन्याय ऐकताच ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत खंबीर भूमिका घ्यावी असे सांगितले. व त्यांनी प्रशासनाच्या परिस्थितीला कंटाळून बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग निवडला. आज दिनांक 24 नोव्हेंबर ला त्यांनी उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ऑल इंडिया पँथर सेनेच्या सहकार्याने सुरुवात केली आहे.
त्याप्रसंगी तहसीलदार जगदाळे यांच्या या मनमानी कारभार हा कदापिही खपवून घेणार नाही. विठ्ठल गेडाम यांचे नावे न्यायोचित मार्गाने शेतीचा फेरफार करावा. सिंदेवाही तालुक्यातील रेती तस्करीची विभागीय चौकशी करावी. अन्यथा पँथर सेना ही चंद्रपुरात भव्य आंदोलन उभे करणार असे रूपेश निमसरकार जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना चंद्रपूर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
उपोषण स्थळी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा सल्लागार संतोष डांगे, सुरेश नारनवरे, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, भैय्याजी मानकर, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष सचिन आत्राम, अतुल भडके, भोजराज नागोसे, विरेंद्र मेश्राम, निशाल मेश्राम, आदी पँथर कार्यकर्ते उपस्थित होते.