नापिकीला कंटाळून युवकाची आत्महत्या. #Suicide


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजूरा तालुक्यात येणाऱ्या कोहपरा येथिल तरूण शेतकऱ्यांने गळफास घेत जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली. नरेश गणेश विधे (26) असे मृत शेतकर्यांचे नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.
नरेशचा वडीलांच्या नावाने चार एकर शेती आहे. या शेतीवर वडिलांनी सेवा सहकारी पतसंस्थेचे ऐंशी हजार रुपये, बचत गटाचे दोन लाख रुपये कर्जाची उचल केली होती. याच वर्षात बहिणीचे लग्न झाले. कर्जाचा डोंगर वाढतच गेला. त्यात शेतीनेही दगा दिला. नपिकीमुळे कर्ज फेडायचे कसे? हा विचार असह्य झाल्याने सायंकाळच्या सुमारास गोठ्यात जाऊन गळफास घेतली. दरम्यान विरूर पोलिस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत