घुग्घुस नगर परिषद कार्यालय स्थलांतरीत केल्यास तीव्र आंदोलन. #Ghuggus

Bhairav Diwase
भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा इशारा.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- घुग्घुस वस्तीच्या मध्यभागी असलेले घुग्घुस नगर परिषदेचे कार्यालय इतर इमारतीत स्थलांतरीत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
घुग्घुस वस्तीच्या मध्यभागी सध्या घुग्घुस नगर परिषदेच्या कार्यालयाची इमारत आहे. ग्रामपंचायतीच्या निर्मिती पासून ही इमारत तिथेच आहे. घुग्घुस वस्तीच्या मध्यभागी बाजारात घुग्घुस नगर परिषद कार्यालयाची इमारत असल्याने कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना महिलांना वयोवृद्धाना अतिशय सोयीस्कर आहे. या इमारतीशी घुग्घुस वासियांच्या भावना जुळलेल्या आहे.
हे कार्यालय स्थलांतरीत केल्यास नागरिकांना मोठया अडचणीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे सामान्य नागरिकांत आक्रोश निर्माण होईल. राजकीय हेतूने हे कार्यालय हलविण्याचा डाव रचल्या जात आहे तसेच अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा गावात चांगलीच रंगत आहे.
त्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी हे कार्यालय स्थलांतरीत करू नये यासाठी घुग्घुस नगर परिषदेचे प्रशासक निलेश गौड व मुख्याधिकारी अर्शीया जुही यांची कार्यालयात भेट घेऊन नगर परिषद कार्यालय स्थलांतरित झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
 
 निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, उत्तर भारतीय आघाडीचे रत्नेश सिंग, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप,राजेश मोरपाका,  भाजपाचे सुरेंद्र जोगी, भारत साळवे, बबलू सातपुते उपस्थित होते.