चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालकांची व प्रत्येक जिल्हयातील
पदाधिका-यांची संयुक्त बैठक आज मुंबई येथे घेण्यात आली. त्यामध्ये सर्व जिल्हयातील पदाधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे नाव ठरविण्यात आले.
🟥
या बैठकीला सर्वानुमते ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य असे नाव ठरविण्यात आले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र विठोबाजी खांडेकर यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी राज्याचे संघटन प्रमुख पदाची जवाबदारी देण्यात आली. खांडेकर यांच्या
निवडीमुळे महाराष्ट्र राज्यातील ऑटोरिक्षा चालकांचे प्रयत्न सोडविण्यात मोलाचे काम करतील राज्यामध्ये संघटन मजबुत करण्याकरीता मोलाची कामगीरी करतील असा विश्वास उपस्थितीत सर्व ऑटोरिक्षा
चालक-मालकांनी व्यक्त केला. मुंबई येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला.
🟥
खांडेकर यांच्या निवडीचे स्वागत महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री मा.आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री श्री. हंसराजजी अहीर, आ. बंटीभाऊ बांगडीया, माजी आ. संजय धोटे, माजी आ. नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष सौ. संध्याताई गुरनुले, जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखीताई कंचर्लावार, उपमहापौर श्री. राहुल पावडे, स्थायी समिती सभापती श्री. संदिप आवारी यांनी स्वागत केले आहे.
🟥