Click Here...👇👇👇

वरूर रोड येथील वाचनालयात बालदिवस साजरा करून विद्यार्थ्यांकरिता घेतली गितगायन व वाचन स्पर्धा. #Childrenday

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालदिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. बालदिनानिमित्त वरूर रोड येथील वाचनालयातील विद्यार्थ्यासाठी वाचन व गितगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांची आकलन शक्ती वाढावी, त्यांच्यात असलेले कौशल्य, नेतृत्व, कर्तुत्व गुणांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला.


विद्यार्थ्याना जर आपले ज्ञान वाढवायचे असेल तर पुस्तकाचे वाचन केले पाहिजे नुसते वाचून काही होणार नाही तर ते आत्मसात केले पाहिजे. यासाठी मन एकाग्र असणे आवश्यक आहे असे विद्यार्थ्याना विशाल शेंडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्याचा उस्पूर्त प्रतिसाद लाभला. वाचन व गीतगायान या दोनही स्पर्धेमध्ये समीक्षा जीवतोडे, श्रुती बोरकर, श्वेता वांढरे, समीक्षा मोडक, ललित शुक्ला, रोहिणी चोथले, काव्या बाकेवार, धनश्री पिदूरकर या चिमुकल्यांनी सहभाग घेत आपली कला सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शेंडे यांनी केले तर आभार मेघा करमनकर हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल शेंडे, मेघा करमनकर, साहिल तिजारे, अश्विनी तेलंग, मयूर जानवे उपस्थित होते.#Childrenday