Top News

ग्रामीण भागात उडणार राजकिय धुराळा. #Election

ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर.
मुंबई:- राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम....
30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 - नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील.
7 डिसेंबर 2021 - दाखल अर्जांची छाननी होणार
9 डिसेंबर 2021 (दुपारी 3 वाजेपर्यंत) - नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत. याच दिवशी निवडणूक चिन्ह दिले जातील.
21 डिसेंबर 2021 - सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान
(गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंतच असेल.)
22 डिसेंबर 2021 - मतमोजणी.

ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी या पोटनिवडणुका होत असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने