💻

💻

देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पोंभुर्णात मोतीबिंदू तपासणी. #Pombhurna

२१ नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन.
पोंभूर्णा:- भाजपा (ग्रामीण)चे जिल्हाध्यक्ष, माजी जि. प. अध्यक्ष व चिंतलधाबा-घोसरी क्षेत्राचे विद्यमान सदस्य देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा पोंभूर्णा तालुक्यात दोन ठिकाणी वेगवेगळ्या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. देवराव भोंगळे पोंभूर्णा तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून गेल्यापासून तालुका भाजपात ते लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मागील चार वर्षांपासून तालुक्यातील कार्यकर्ते एकत्रित येऊन त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.
तीच परंपरा पुढे नेत यावर्षी सुध्दा पोंभूर्णा येथे राजराजेश्वर सभागृहाच्या प्रांगणात लाॅयन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा, लाॅयन्स क्लब ऑफ चंद्रपुर महाकाली, महाविर इंटरनॅशनल चंद्रपुर व देवराव भोंगळे मित्र मंडळ पोंभूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर व कृत्रिम भिंगारोपन मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दिनांक २० नोव्हेंबर शनिवार रोजी आयोजित करण्यात आलेले असून, वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे दिनांक २१ नोव्हेंबर रविवार ला जुनगांव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी (२१ नोव्हेंबर) वृध्दांना काठी वाटपाचा कार्यक्रम सुध्दा आयोजित आहे. तर रात्री १०.०० वाजता "स्वरानंद" चंद्रपुर यांचा सुगम संगिताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
देवराव भोंगळे जि. प. वर निवडून गेले तेंव्हापासून यांची पोंभूर्णा तालुक्यातील भाजपा वर चांगली पकड आहे. आमदार सुधिर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाने ती अधिकच घट्ट झाली आहे. पोंभूर्ण्यातील कार्यकर्ते त्यांना आदराने "दादा" असे संबोधतात. त्यांचा वाढदिवस म्हणजे पोंभूर्णा तालुक्यात एक दिवशीय उत्सव असतो. तो उत्सव यावर्षी दोन दिवस चालणार आहे. मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिराला मेडिकल कॉलेज सेवाग्राम चे नेत्रतज्ञ डाॅक्टर शुक्ला, पोंभूर्णा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदेश मामीडवार, वैद्यकीय चिकित्सक डाॅ.अनिकेत गेडाम, लाॅयन्स क्लब चंद्रपुर महाकाली चे अध्यक्ष शाम धोपटे, सचिव अजय वैरागडे, महाविर इंटरनॅशनल चंद्रपुर चे अध्यक्ष हरीष मुथा, सचिव मनिष खटोड, हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर २१ नोव्हेंबरला जुनगांव येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या पटांगणात रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून या शिबिरात सुध्दा तज्ञ डाॅक्टरांची चमू मदत करणार आहे. म्हणून तालुक्यातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दोन्ही वैद्यकीय सेवांसोबत सुगम संगिताचा सुध्दा लाभ घ्यावा असे आयोजक म्हणून देवराव भोंगळे मित्रपरिवार पोंभूर्णा यांनी विनंती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत