मोठया प्रमाणात नक्षली ठार झाल्याची शक्यता?
गडचिरोली:- गडचिरोली-छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या कोटगुल-ग्यारापत्ती परिसरात आज सकाळपासून सुरू असलेल्या पोलीस-नक्षल चकमकीत नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलीस जवानांना यश आले मोठ्या प्रमाणात नक्षल ठार झाल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचे अधिकृत वृत्त अजून प्राप्त झाले नाही.
कोटगल ग्यारापत्ती परिसरात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नक्षलविरोधी अभियान पथकाने नक्षल्यांविरुद्ध तीव्र मोहीम राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्याकडून पोलीस जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला असता जवानांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले यात मोठ्या प्रमाणातनक्षल ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आहे. ही चकमक अजूनही सुरू असून पोलीस जवानांनी शोध अभियान तीव्र केले आहे.