Top News

उर्मटपणे बोलणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन. #Gondpipari


तहसीलदार यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन आमरण उपोषणाची सांगता.

गोंडपिपरी:- विविध विभागाचा आढावा घेण्याकरिता ग्रामपंचायत वढोली येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली. महसूल विभागाची वेळ आली तेव्हा नागरिकांनी तलाठ्यावर ताशेरे ओढले. शेतकरी बांधवांना कामासाठी दिवसेंदिवस ताटकळत ठेवणे, कामासाठी दलाल नेमून शेतकऱ्यांकडून पैसे घेणे, पुरबुडी व अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम देण्याकरिता पैसे घेणे, दाखल्यांसाठी पैसे घेणे, कामासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावयास लावणे, यामुळे नागरिक संतप्त झाले. यावर सरपंचांनी जाब विचारला असता तलाठ्यांनी सरपंचाला "मी तुमच्या बापाचा नौकर नाही" असे उर्मटपणे उत्तर दिले. या सगळ्या प्रकारांनतर तलाठी जनार्धन बल्की यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्याची गावकऱ्यांनी ग्रामसभेत मागणी केली. ग्रामसभेचा ठराव घेत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनाची तात्काळ दखल घेऊन त्यांचेवर ७ दिवसाचे आत निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व वढोली साजा १० तुन त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी. ७ दिवसात निलंबनाची कार्यवाही न झाल्यास ८ व्या दिवसापासून तहसिल कार्यालय, गोंडपिपरीच्या समोर सर्व ग्रा. पं. पदाधिकारी व सदस्य तथा ग्रामस्थासोबत बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला होता.

मात्र निवेदनाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नसल्याने आजपासून तहसिल कार्यालयासमोर राजेश कवठे व त्यांचे सहकारी आमरण उपोषणाला बसले होते. उर्मट तलाठ्याच्या विरोधातील बेमुदत आमरण उपोषणाला राजेंद्रभाऊ वैद्य जिल्हाध्यक्ष चंद्रपुर, बबनजी निकोडे, सुभाषराव माडुरवार, कुणालजी गायकवाड यांच्या उपस्थितीत तहसीलदार के. डी. मेश्राम व ठाणेदार जीवन राजगुरू गोंडपिपरी यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आणि 2 दिवसांत अहवाल सादर करून कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर राजेश कवठे सरपंच आणि सर्व ग्रा. प. सदस्य तथा तंटामुक्त अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वढोली यांचे बेमुदत आमरण उपोषणाची सांगता  हस्ते लिंबू पाणी पिऊन करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने