जुगार अड्यावर धाड; बारा जुगाऱ्यांना अटक. #policeChandrapur

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: 36 लाखांचा ऐवज जप्त.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- शहरातील बाबानगरात जुगार खेळणा-या बारा जुगा-यांना स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल 36 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने आज सोमवारी (8 नोव्हेंबर 2021) करण्यात आली आहे.


अप्पर पोलिस अधीक्षक यांना चंद्रपूर शहरातील बाबा नगरात राजेश गुप्ता यांचे घरी पैसाचा जुगार खेळल्या जात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाबानगरात जूगा-यांना अटक करण्यासाठी पाळत ठेवली होती. आज सोमवारी राजेश गुप्ता यांचे घरी जुगार खेळणे सुरू असताना अचानक धाड टाकून 36 लाख 57 हजाराघा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये  रोख रक्कम 1 लाख 97 हजार 250 रूपये, 11 मोबाईल, तीन चार चाकी गाड्या, तीन दुचाकी गाड्या असा 36 लाख 57 हजार 750 रूपयाचा मुद्देमाल जुगारादरम्यान हस्तगत करण्यात आला आहे. 
        अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोलू उर्फ ईश्वर सुधाकर ठाकरे (29) रा. पेठ वार्ड राजुरा, राजेश रामचंद्र गुप्ता(44) महाकाली काॅलरी चंद्रपूर, प्रदीप दिनकर गंगमवार (41) महाकाली वार्ड चंद्रपूर, हाफिज रेहमान खलील रेहमान (53) गुरूनगर, वणी जिल्हा यवतमाळ, शेख आसीफ शेख चांद (30) रा. पारवा तर.  घाटंजी यवतमाळ, नंदकुमार रामराव खापने (29) रा. कोलगाव ता. मारेगाव यवतमाळ, गणेश रामदास सातपाडे (35) रा.  गडचांदूर, समिर सचिन संखारी (50), विवेक नगर, चंद्रपूर, आकाश चंद्रप्रकाश  रागीट (30) लक्कडकोट राजुरा, गौरव लक्ष्मण बंडीवार (26) रा. नांदाफाटा कोरपना, श्रीनिवास रामलू रंगारी (50) रा.  लालपेठ काॅलरी चंद्रपूर,  सुरेश पुनराज वावरे (53) बाबुपेठ चंद्रपूर यांचा समावेश आहे. तसेच  एका बालकाचाही समावेश आहे.#Chandrapur

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत