घरात प्रवेश करून माकडाने घेतला मुलीला चावा. #Monkey

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरालगत असलेल्या संजय नगर परिसरात माकडांनी रविवारी उच्छाद मांडला असून एका मुलीला घरात घुसून चावा घेतल्याची घटना घडली आहे. प्रणाली सुधाकर पाटील असे जखमी मुलीचे नाव असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
संजय नगर परिसराला जंगल लागून असून येथून मोठ्या प्रमाणात दररोज माकडांची टोळी संजय नगर, कृष्णनगर परिसरात धुमाकूळ घालत असतात. तसेच नागरिकांच्या छतावर तसेच घरात घुसून मोठ्या प्रमाणात नासधूस करत असतात. अशातच आज रविवारी दुपारच्या सुमारास काही माकडांची टोळी संजय नगर परिसरात आली. दरम्यान परिसरात राहणाऱ्या संदेश पाटील यांच्या घरात माकडाने प्रवेश करून प्रणाली पाटील या मुलीवर अचानक माकडाने हल्ला केला. यात प्रणाली जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या माकडांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.