दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सावलीत तरुणाचा खुन. #Murder

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली येथील सावतामाळी चौक परिसरात रविवारच्या रात्रौच्या सुमारास एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. योगेश ऊर्फ फंट्या मारोती गुरनुले वय 30 वर्ष असे मृतक तरुणाचे नाव आहे.

🐕वासनेची भूक मिटवण्यासाठी कुत्रीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक.
👇👇👇👇👇👇

येथील सावतामाळी चौक परिसरात योगेश हा आपल्या परिवारासह राहत होता. घराशेजारी असलेल्या इसमासोबत पैसे चोरल्याच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपीने योगेश च्या डोक्यावर काठीने प्रहार केले तो खालीच कोसळला. या संदर्भात सावली पोलिसांना माहिती देण्यात आली त्यावरून सावली पोलीस कसलाही विलंब न करता त्वरित घटनास्थळी धाव घेतली व त्याला सावली चे ग्रामीण रुग्णालयात भरती केले. 
परंतु उपचारादरम्यान योगेश चा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी व मुले असा परिवार आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला असून आरोपी हा पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, सावली चे ठाणेदार रोशन शिरसाट, सहायक फौजदार बोधे, खरकाटे करीत आहेत.