23 बैलांसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगतसिंग वधावन, विरुर स्टेशन
विरुर स्टे.:- गडचिरोली जिल्ह्यातील अवैध खरेदी केलेले जनावरे विरूर व परिसरातील मार्गाने तेलंगणात गोवंशतस्करी करण्यात येते. त्यामुळे या गोवंश तस्करीच्या मार्गावर पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. दरम्यान गुरुवारी एका आयशर वाहनातून कोठारी आर्वी -अंतरगाव मार्गे तेलंगणात जनावरांची वाहतूक करीत असतांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पकडले. 23 बैलांसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदीमुळे विरूर व परिसरातातून महाराष्ट्राच्या सिमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात तस्करी करण्यात येते. गुरुवारी एमएच 34 बी.जी. 9908 या या मालवाहू वाहनाने 23 बैल तेलंगनात कत्तलीसाठी नेण्यात येत असतांना सकाळी पोलिसांनी रंगेहात पकडले. बैल व वाहन ताब्यात घेतले असून गोवंश तस्करी करणाऱ्या गाडीचालक युनुस अहमद शेख रा. गोयेगाव जि. आसिफाबाद याच्या विरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 5 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून बैल लोहारा येथील गोरक्षण केंद्र येथे रवाना करण्यात आले.
सदरील कारवाई विरुर स्टेशन पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सदानंद वडतकर, पोहवा माणिकराव वाग्दरकर, नापोशी मल्लया नारगेवर, पोशी सुरेंद्र काळे, पोशी विकास मार्कडे, यांनी पार पाडली. पुढील तपास पो. उपनिरीक्षक सदानंद वडतकर करीत आहेत.#police
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत