Top News

अवकाळी पावसामुळे धान पिकाला फटका. #Pombhurna

नुकसान झालेल्या धान पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांची मागणी.
पोंभुर्णा:- अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले धान पीक पाण्यात बुडाल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांवर आज उपासमारीची पाळी आली आहे. सदर नुकसान झालेल्या धान पिकांचे पंचनामे करून एकरी वीस हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी निवेदनाद्वारे माननीय तहसीलदार पोंभुर्णा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना कळविण्यात आले.
मागील दोन दिवसांपासून पोंभूर्णा तालुक्यात अवकाळी पावसाने धान पिकाला झोडपून काढले होते. कापून ठेवलेले धान पाण्यात भिजल्यामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले. शेकडो एकर क्षेत्रातील धान पिक पाण्यात बुडाले आहे. सरकारी स्तरावरुन अद्याप सर्व्हे सुरू करण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने