शेणगाव ते भेंडवी रस्त्यांच काम जलद गतीने पुर्ण करा.

Bhairav Diwase
आम आदमी पार्टीचे नेते सुनिल राठोड यांच्याकडुन आमदार धोटे यांना निवेदन.
जिवती:- अती दुर्गम भाग म्हणुन ओळखला जानार्या जिवती तालुक्यातील रस्त्यांकडे राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोक प्रतिनीधीनी तातडीने लक्ष घालुन रस्त्यांच्या कामाला जलद गतीने पुर्ण करावे असे आव्हाण आम आदमी पक्षाचे जिवती तालुका उपाध्यक्ष मा. सुनिल भाऊ राठोड  यांनी केले आहे झोपेचा सोंग करत असलेल्या सरकारला या रस्त्याबद्धल वेळोवेळी सांगुन सुद्धा याकडे दुर्लक्ष करित आहे रस्त्यावरुन जाताना रस्ता आहेत की गड्डा हेच समजत नाही आणि अस्या रस्त्यांचे गड्डे बुजवायला डस्ट मातीच वापर करुन गड्डे बुजवतात याच परिनाम आम्हा ये-जा करणाऱ्या प्रवासीना भोगावा लागतोय समोर जानार्या गाडी सुद्धा दिसत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात डस्ट उडतात जिवमुठ्ठीत घेऊन प्रवास करावा लागतोय इतकी बिकट परिस्थिती झाली आहे तरी आमदार धोटे साहेब या कडे लक्ष देऊन  शेणगाव ते भेंडवी पर्यंतच्या रस्त्यांच्या कामाला जलद गतीने  पुर्ण करावे करिता आम आदमी पक्षाचे जिवती तालुका उपाध्यक्ष मा. सुनिल भाऊ राठोड यांच्या कडुन आमदार सुभाष धोटे यांना निवेदन देण्यात आल व दिनांक ०६/१२/२०२१ पर्यंत रस्त्यांच काम जलद गतीने पुर्ण करा अन्यथा येत्या ०७/१२/२०२१ला आम आदमी पक्षाच्या वतीने रस्ता खोदो आदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पक्षाचे जिवती तालुका उपाध्यक्ष मा. सुनिल भाऊ राठोड व सामाजिक कार्यकर्ते मनमंत भाऊ वारे यांनी निवेदन द्वारे केला आहे