Click Here...👇👇👇

भद्रावतीत सर्पमित्रांनी दिले दुर्मिळ सापाला जिवदान. #Snake

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथील खापरी रस्त्यावरील अनिल साव यांच्या कुक्कुटपालन केंद्रात दुर्मिळ प्रकारचा अर्ध रंगहीन नाग साप आढळून आला असून त्याला सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.
सदर साप चार फूट लांबीचा असून त्याची वनविभागाच्या कार्यालयात नोंद करुन त्याला त्याच्या संरक्षित अधिवासात सोडण्यात आले. या वेळी सर्पमित्र राज येरने, श्रीपद बाकरे, संकेत सातभाई ,शुभम मुरकुटे,अमर किन्नाके व शिथिल मैसकर, दीपक सगदेव उपस्थित होते. #Snake