दिवं. शोभाताई हिरादेवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामगीता ग्रंथ वितरीत. #program

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
राजुरा(बाखर्डी):- राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनात श्रीगुरुदेव सेवा पुरस्काराच्या मानकरी दिवंंगत शोभाताई पुरुषोत्तम हिरादेवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे राहते घरी बाखर्डी येथे ग्रामगीता ग्रंथ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्राचार्य शरदजी जोगी, लक्ष्मणराव कुटेमाटे, बापुजी बोबडे, सुरेश खुसपुरे, प्रभाकर देवतळे, ॲड.राजेंद्र जेनेकर, सुरेश कोल्हे, प्रशांत काकडे, पुंडलिक टोंगे, भाऊराव दुधलकर, मुर्लीधर निमकर, अमरनाथ जिवतोडे, रामकृष्ण खिरटकर, भाऊराव बोबडे, उत्तमराव झाडे, नामदेव मुसळे आदी मान्यवरांचे उपस्थितीत सौ.किरण व लक्ष्मीकांत हिरादेवे, तसेच सौ.ज्योती व प्रफुल्ल हिरादेवे यांचे हस्ते ग्रामगीता ग्रंथ व राष्ट्रसंत दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता प्रज्वल देवतळे, ओम हिरादेवे, आसावरी हिरादेवे, प्रगती जेनेकर, चैतन्य जेनेकर, विभांशू, वैभवी यांनी परिश्रम घेतले.#program