Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

गोवरी येथे भाजपाचे रास्ता रोको आंदोलन. #Rajura

उपविभागीय अभियंता यांचे पाच दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन.

शेकडो ट्रकांच्या लांबच लांब रांगा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
राजुरा : राजुरा-गोवरी-कवठाळा मुख्य मार्गाचे बांधकाम मागील अनेक दिवसांपासून रखडले असून याचा त्रास सर्व सामान्य नागरिक व वाहनधारकांना होत आहे, रस्त्यावरुन उडणाऱ्या धुळीच्या लोंढ्यानी नागरिकांचे जगणे कठीण झाले असून हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. तात्काळ रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु करण्याच्या मागणीसह इतर मागण्या घेऊन गोवरी, पोवनी, चिंचोली (बु.) येथील भाजपच्या वतीने गोवरी येथे जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
बल्लारपूर वेकोळीअंतर्गत असलेल्या कोळसा खाणीतील कोळशाची वाहतूक करणारा राजुरा-गोवरी-कवठाळा मार्गाच्या रस्त्याचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे ते तात्काळ सुरु करण्यात यावे, वेकोलीची कोळसा वाहतूक व नाला दुसरीकडून वळविल्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, चिंचोली (खु), साखरी गावांना जोडणारा जिल्हा मार्ग वेकोलीने तोडल्या गेला तो पुरवत करण्यात यावा यासह इतर मागण्या घेऊन गोइरी येथे (दि. १०) सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलन स्थळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असता बांधकाम उपविभागीय अभियंता बाजारे यांनी पाच दिवसात रस्त्याचे बांधकाम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे, नगरसेवक राजू डोहे, हरिदास झाडे, विलास खारकर, सचिन डोहे, संदीप पारखी, अविनाश उरकुडे, भास्कर इटनकर, शंकर बोढे, चेतन बोभाटे, सिद्धार्थ कासवटे, हरीचंद्र जुनघरी, भास्कर जुनघरी, महेश कोडगीरवार, गोसाई उताने, महादेव लोहे, विठ्ठल उताने, कुसं पडवेकर, प्रभाकर इटनकर, महेश गंधेमवार, पांडुरंग चिंचोलकर, विलास लोहे, गज्जू साळवे, गज्जू उरकुडे, अरुण मशारकर, शंकर गोंडे यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत