वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार. #Tigerattack


वन्यप्राणी गणनेसाठी कर्तव्यावर महिला वनरक्षक.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प असलेल्या ताडोबात वाघिणीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. वाघिणीच्या हल्ल्यात वनरक्षक महिलेचा मृत्यू झाला आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या वन्यप्राणी गणना सुरू असून, गणनेच्या कर्तव्यावर असतानाच माया नावाच्या वाघिणीने हल्ला केला. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र अभयारण्यमध्ये वन्यप्राणी गणनेचं काम सुरू आहे. वन्यप्राणी गणनेसाठी कर्तव्यावर असलेल्या एका महिला वनरक्षकावर माया नावाच्या वाघीनीने हल्ला केला. या हल्ल्यात वनरक्षक महिलेचा मृत्यू झाला.
शनिवारी (20 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोर झोनमधील कोलारा गेट येथील वॉटर होल क्रमांक 97 जवळ ही घटना घडली. स्वाती ढोमणे असं महिला वनरक्षकाचे नाव आहे. या घटनेने ताडोबा व्याघ्र अभयारण्यात एकच खळबळ उडाली आहे.
 वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिला वनरक्षक स्वाती ढोमणे. तीन वन मजूर आणि एक महिला वनरक्षक यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिककरणाकडून करण्यात येणाऱ्या व्याघ्र गणना सुरू केली होती. सकाळी 7 वाजता कोलरा गेटपासून आत 4 किमी गेल्यानंतर वॉटर होल 97 जवळ त्यांना वाघ असल्याचं दिसलं. त्यांच्यापासून जवळपास 200 किमी अंतरावर वाघीण रस्त्यावर बसलेली होती.
त्यामुळे ते वाघीण जाण्याची वाट बघत बसले. एक ते दीड तास त्यांनी वाघीण निघून जाण्याची प्रतिक्षा केली. मात्र, वाघीण तिथेच बसून होती. त्यामुळे त्यांनी जंगलातून दुसऱ्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न केला. जंगलात हालचाल झाल्याचं वाघिणीला दिसलं. त्यानंतर वाघिणीने पाठलाग करत हल्ला केला.
स्वामी ढोमणे यांच्यावर हल्ला केल्या तेव्हा वन मजूर पाठीमागे होते. माया नावाच्या वाघिणीने हल्ला केल्यानंतर स्वाती ढोमणे यांना फरफटत जंगलात नेलं. शोध घेतल्यानंतर जवळच त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा मृतदेह चिमूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यांच्या कुंटुंबियांना सर्व प्रकारची मदत करण्यात आल्याची माहिती डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने