14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा द्या

Bhairav Diwase
भाजपा महिला आघाडीचे राज्यपालांना निवेदन
पोभूर्णा :- पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथील एका अल्पवयीन मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील तिन युवकांनी चार महिण्यांपुर्वी आळीपाळीने अत्याचार करुन गर्भवती केले व याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली अश्या तीनही नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भाजपा महिला आघाडी पोंभूर्णाच्या वतीने राज्यपालांना तहसिलदार मार्फत करण्यात आली.
पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव मोरे येथे घडलेल्या घटनेतील तीनही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे व प्रामुख्याने महिला व मुलींमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.तीनही नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी भाजपा महिला आघाडीच्या वतीने तहसिलदार मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. सोबतच ठाणेदार यांनाही निवेदन देण्यात आले. तालुक्यातील महिला व मुलींच्या सुरक्षेच्या संबंधाने शासनाने पावले उचलावीत व कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, श्वेता वनकर,सुनीता मॅकलवार, नंदा कोटरंगे, उषा गोरंतवार, शारदा वाढई, वैशाली वासलवार, शारदा गुरनुले, उषाराणी वनकर उपस्थित होते. यावेळी निवेदन देताना मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी बहुसंख्येने मुलींची उपस्थित होती.