💻

💻

३० वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू #accident


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- बुधवारला सायंकाळी आपले काम आटोपून चिंचोली कडे जात असताना सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास विरूर जवळ असलेल्या नाल्या समोर दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने चिंचोली येथील स्वप्नील भाऊराव बोभाटे वय वर्ष 30 याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
विशेष म्हणजे मागील काही दिवसापूर्वी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चिंचोली येथील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कापल्या मुळे काल उभे असलेले डोलदार पिक वाळु लागले त्यामुळे वीज जोडणीच्या संदर्भात बुधवारी गुरुकुल विद्यालयाचे संस्थापक पांडुरंग वडस्कर यांच्यासह 50 ते 60 नागरिक वीज वितरण कार्यालय मध्ये आले होते. त्यामध्ये स्वप्निल भाऊराव बोभाटे यांचे सुद्धा मिरची पिक वाढत असल्यामुळे हा सुद्धा ह्या नागरिकांमध्ये उपस्थित होता. यातील काही शेतकर्‍यांनी कृषी पंपाचे बिल भरलेले असताना सुद्धा वीज का कापण्यात आली याची विचारपूस करण्याकरिता वीज वितरण कार्यालय विरुर येथे आले होते. ते काम आटोपून जात असताना स्वप्निल यांचा अपघाती मृत्यू झाला.
घटनेची माहिती विरूर पोलिस स्टेशन ला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण व पोलीस हवालदार देवाजी टेकाम यांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून सदर मृतदेह शव शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत