Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पिकअपच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार #accident

कोरपना:- महेंद्र पिकअप चारचाकी वाहनाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार दि. २८ ला ३:४५ वाजता दरम्यान कोरपना-आदिलाबाद मार्गावरील पारडी गावाजवळ घडली.
आनंद योगाजी बाबुळकर (२१) रा.सावरी त किनवट असे मृतकाचे नाव आहे. तो कोरपना कडे दुचाकीने येत असताना सामोरा समोर पिकअपला धडक दिल्याने जागीच तो मृत पावला.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक कर्मचारी बन्सीलाल कुडवले, अशोक मडावी, भगवान पडवाळ व कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
मृतकाला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत