(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी नगरसेविका सौ. निलम निखिल सुरमवार, निखिल सुरमवार, मुकेश सहारे, मंगेश सहारे, सुदाम राऊत, सोनु गणवीर, नगरपरिषद चे सेवानिवृत्त कर्मचारी नंदकिशोर संतोषवार व संतोष कोटरंगे यांनी आज दिनांक 5 ला माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात माजी आमदार अतुल देशकर व सुहास अलमस्त यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश घेतला.
यावेळी ब्रम्हपुरी विधानसभा प्रमुख प्रा. शेख,अरुण शेंडे, जि. प.सदस्य संतोष तंगडपल्लीवार, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील गड्डमवार, अशोक आकुलवार, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, भाजपा शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, माजी सभापती कृष्णा राऊत, पाथरी चे उपसरपंच प्रफुल तुमे, गौरव संतोषवार, राकेश विरमलवार, माजी सरपंच अतुल लेनगुरे, हरीश जक्कुलवार, राहुल लोडेल्लिवार, इम्रान शेख, आदर्श कुडकेलवार या पदाधिकारी सोबत इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.