💻

💻

स्थलांतरीत गरोदर, स्तनदा महिलांनाही घेता येणार योजनांचा लाभ


पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील अथवा पोंभूर्णा तालुक्यातून ग्रामीण व आदिवासी क्षेत्राअंतर्गत गरोदर स्त्री , स्तनदा माता व ० ते १८ वर्ष वयोगटातील लाभार्थी राज्यात किंवा परराज्यात १ महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी स्थलांतरीत करीत असलेल्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ स्थलांतरीत ठिकाणीच मिळावे , या हेतूने जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सदर उपक्रमाकरीता पंचायत समिती पोंभूर्णा अंतर्गत महिला व बाल कल्याण विभाग , आरोग्य विभाग , शिक्षण विभाग व इतर विभागांनाही संलग्न करण्यात आले आहे.यासाठी तालुक्यात किंवा तालुक्यातून स्थलांतरीत नागरिकांची प्राथमिक स्वरुपाची माहिती संकलीत करण्यात येत असून या माहितीच्या आधारे जिल्हास्तरावरून गुगल फार्म उपलब्ध असून त्याबाबतची लिंक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे. हेल्पलाईन मदतीला गुगल फार्मच्या लिंकमध्ये लाभार्थ्यांचे पुर्ण नाव,फोन नंबर,  तालुक्यातील किती बाहेर गेले, किती तालुक्यात आले, गावाचे नाव, आदी माहिती नमूद करावी. गर्भवती व स्तनदा माता आणि मुले अडचणीत असल्यास त्यांनी ८७६६६८०९९२ या मोबाईल हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पंचायत समिती पोंभूर्णा द्वारे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत