Top News

चुनाळा येथील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्याबाबत तथा शेतकऱ्यांच्या इतर समस्या त्वरित सोडविण्यास माजी आमदार अँड. संजय धोटे यांना निवेदन #Rajura

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- विधानसभा क्षेत्रातील चुनाळा तह.राजुरा या भागातील शेतकऱ्यांना नियमित विज उपलब्ध होत नसून चुनाळा व बामणवाडा शिवे मधिल शेतकऱ्यांना नाहक त्रास सहण करावा लागत आहे.शेतकऱ्यांना विज पुरवठा होण्यास विंलब होत असल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहेत.
चुनाळा , बामणवाडा व विहिरगाव येथील विज पुरवठा सब स्टेशन विरुर स्टेशन येथुन होत असल्याने या भागातील शेतकरी वर्गाला नियमित विद्युतीकरण चा सामना करावा लागत आहे. सदर विज पुरवठा या भागातील शेतकऱ्यांना बामणवाडा सब स्टेशन द्रारा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहेत.
या भागातील शेतकऱ्यांना विज बिल बरोबर देण्यात येत नसुन मिटर रिडींग अदाजे स्वरूपात दाखवुण वाढिव बिल शेतकऱ्यांना देत असल्याने नाहक त्रास होत आहेत. वर्षे भरात तिन महिने लाईट असताना शेतकऱ्यांना पुर्णता : बिल लादण्यात येत आहेत हे चुकीचे असुन संयुक्तिक बिल पाठवावे अशी विनंती शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. योग्य बिलाचा भरणा शेतकरी करण्यास तयार आहे.
अनावश्यक बिल शेतकऱ्यांना देण्यात आले असून सदर बिलात २५ टक्के सुट देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. लाईट राहत नसताना चुकीचे बिल व अदाजे घेतलेल्या रिडींग चे बिल शेतकरी भरण्यास असमर्थ असून शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावात अशी मागणी करण्यात आली आहे.
करिता वरील सर्व बाबींचा सकारात्मक विचार करुन चुनाळा येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावात अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.
यावेळी या क्षेत्रातील मान्यवर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व चुनाळा येथील सरपंच बाळनाथ वडस्कर तथा चुनाळा शाखा प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड उपस्थित असुन याच्या सोबत शेतकरी वर्ग सतिश मोरे, रामदास साळवे, सुरेश भुंबे, मनोहर पोटे, बंडू पोटे, बालाजी निखाड,सुनील हेपट, बंडू मोरे, गौरव आगलावे, प्रविण निखाडे अन्य शेतकरी बाधव उपस्थित असुन विद्यूत विभागाना सुचणा कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने