💻

💻

भारी पोलीस स्टेशन अंतर्गत भव्य रोगनिदान शिबीरांचे आयोजन #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील अतिदुर्गम महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या भारी पोलीस स्टेशन अंतर्गत भव्य रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून या भव्य मोफत रोगनिदान शिबिरांचा लाभ घेतला व भारी पोलीस स्टेशन अंतर्गत सामान्य जनतेच्या सेवेचे वृत्त पोलीस दलाने अंगी बाळगून या तालुक्यातील सामान्य नागरिकांना सेवा कशी देता येईल या हेतूने रोगनिदान शिबिराचे आयोजन करुन गरजुना मोफत उपचार मिळवुन दिले.
यावेळी उप विभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक भारी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर साहेब, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. प्रविण पंत, डॉ अमित मुरके, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. नगना नायडु डॉ. प्रिती चव्हाण, डॉ. छाया शेडमाके व या रोगनिदान शिबीरांचे आयोजक भारी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सटवाजी नामपल्ले संतोष नेताम प्रेमदास टेकाम मंगेश नागरकर जितेंद्र राजूरकर मंगेश भोयर शैलेश शेलोटे रितेश चौधरी भारत बोडके राजेश राठोड लखन चव्हाण ईश्वर देवकते सह भारी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत