Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

डोंगरगाव परिसरात वाघाचा वावर

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव मार्गावर बुधवारला रात्रौच्या सुमारास वाघ दिसून आला. त्यामुळे डोंगर गाव परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर भाग हा धाबा वनपरिक्षेत्रात येतो.
या जंगलात विविध प्राण्यांचा अधिवास आहे.लगतच असलेल्या कन्हाळगाव अभियारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, चितळ, हरीण, यासह अन्य वन्यजीवांचा अधिवास आहे. अभियारन्यातून जंगल भ्रमंती करत वाघ डोंगरगाव मार्गावर आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.
अश्यातच बुधवारला रात्रोच्या सुमारास डोंगरगाव मार्गावर वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या डोंगरगाव परिसरात शेतीचे काम सुरू आहे. कापूस वेचणी, हरभरा पेरणी, यासह अन्य शेत कामाची लगबग सुरू आहे. आणि परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.
वन्यजीव वनपरीक्षेत्राच्या बाहेर कधी मार्गावर तर कधी शेत शिवारात दिसुन येत असल्याने मानव आणि वन्यजीव संघर्षात वाढ होण्याची दाट शयकता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत