पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा आम आदमी पार्टी कडून जाहिर निषेध #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- TV9 चे प्रतिनिधि निलेश डाहाट यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीचे लोकांनी जबर मारहाण करून जखमी करण्यात आले. सध्या त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहे.
tv9 प्रतिनिधी निलेश डाहाट यांना बेदम मारहाण

शिवसेनेचे युवा सेना समन्वयक सहारे आणि पवन नगराळे यांनी इंदिरानगर भागात देशोन्नति प्रतिनिधि विनोद बदखल आणि निलेश डाहाट गप्पा करत असताना सहारे आणि नगराळे यानी तेथे पोहचत अवैध धंद्याची बातमी प्रकाशित केल्यावरुन वाद निर्माण केला व तसे ते शांत पण झाले.
मात्र घटनास्थळावरून घरी जात असताना निलेश डाहाट यांचा सहारे आणि नगराळे यांनी पाठलाग करून रामबाग वसाहत जवळ माता मंदिर जवळ लाता बुक्क्यांनी मारहाण केली तसेच गट्टू ने पन मारले, यात नीलेश डाहाट यांना पाठीवर पोटावर जबर मार व ओठावर टाके बसले. अश्या गुंड शिवसैनिकांचा आम आदमी पार्टी जाहिर निषेध करते. आम आदमी पार्टीचे शिष्टमंडळ निलेश डाहाट यांना शासकीय रुग्णालयात भेट देऊन प्रकृतीची विचारपुस केली.
 या वेळी आप चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, युवा अध्यक्ष मयूर राइकवार, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, राजू कूड़े महानगर सचिव , महानगर उपाध्यक्ष सिकन्दर सागोरे, दिलीप तेलंग, तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.