जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जखमी मगरीच्या पिल्लाला स्थानिकांनी दिले जिवनदान #Chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर येथे नाल्यात जखमी अवस्थेत असलेल्या मगरीला स्थानिकांनी तात्काळ उपचारासाठी रेस्क्यु सेंटरला हलविले आणि त्या मगरीचा जीव वाचवला.
रयतवारी कॉलनी परिसरातील नाल्यात जखमी अवस्थेत मगरीचे पिल्लु आढळले.
स्थानिकांना लक्षात येताच त्यांनी मगरीचा पिल्लुला पकडून वनविभागाचा ताब्यात दिले. चंद्रपूर येथिल रेस्क्यु सेंटरला उपचारासाठी मगरीचे पिल्लु नेण्यात आले आहे. काही दिवसापुर्वी शहरालगत वाघाचे दर्शन झाले होते.आता शहारातील मध्यवर्ती भागात मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत