मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन #Gondpipari

Bhairav Diwase
गोंडपिपरी:- समर्थ शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथील "राष्ट्रीय सेवा योजना" विभागाच्या वतीने दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हा उपक्रम प्राचार्य डॉ. चक्रधर ए. निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

या मतदान नोंदणी शिबिराचे आयोजन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र डी. अक्कलवार, प्रा. अविनाश वि. चकिनारपूवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश वरघणे, प्रा. डॉ. रुद्रप्रताप तिवारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.