💻

💻

गावकऱ्यांच्या स्वागतासाठी बिबट्या थेट बसला कमानीवर #chandrapur

चंद्रपूर:- राज्यातील काही गावांमध्ये अजूनही बिबट्याची दहशत कायम आहे. पुन्हा एकदा चंद्रपुरात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपुरात वसाहतीच्या कमानीवर बसून बिबट्यानं नादच केला आहे. या कमानीवर बिबट्याने जाऊन चक्क आराम केला. त्याचे फोटो समोर आले आहेत.
वसाहतीच्या कमानीवर बिबट्या बसल्याचे पाहिल्यानंतर अनेकांची बोबडी वळली. काहींनी तर आपल्या घराची दारंही बंद करून घेतली. चंद्रपूर शहरालगतची घटनेने खळबळ उडाली आहे.

📛विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करावे:- श्याम बोबडे
👇👇👇👇👇

पद्मापूर कोळसा खाण वसाहतीच्या कमानीवर चक्क बिबट्याची बैठक, या भागात रात्रकालीन ड्युटीवर ये-जा करणाऱ्या कामगारांसाठी बनला धोका, बिबट्याला बघण्यासाठी काही नागरिकांनी गर्दीही केली होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील गाव, शहरात आता वन्यजीवांची घुसखोरी सूरू आहे. नेहमीच दृष्टीस पडणाऱ्या वन्यजीवाने दहशत पसरली असतांना एका बिबट्याने मात्र लोकांचे लक्ष केंद्रित केले.
हा बिबट्या चक्क वसाहतीचा गेटवर विराजमान झाला. गेटवर विश्रांती घेत असतांनाचा विडीओ व्हायरल झाला आहे हा प्रकार पद्दमापूर वेकोली वसाहतीचा गेटवर घडला.ऐटीत बसलेल्या बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत