💻

💻

काँग्रेस नेते विजय बावणेसह नितीन बावणे यांना तात्काळ अटक करा :- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे #chandrapur

"त्या" कॉंग्रेस नेत्यांना अटक करा, अन्यथा जिल्हात मोठं आंदोलन करू


आज कोरपना शहरात नगरपंचायत मतदान आहे, या मतदानाच्या पूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांना आपला पराभव दिसत आहे यामुळे निराशेपोटी काल रात्री 7.30 ते 8 च्या दरम्यान रात्री शहरात काँग्रेस नेते विजय बावणे व नितीन बावणे व इतर कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या गाडीवर दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपी विरुद्ध कलम कलम १४३,१४७,३२३,३४१,४४७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


कोरपना येथे भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या गाडीवर काँग्रेस नेत्यांकडून प्राणघातक हल्लाहि घटना काल रात्री शहरात काँग्रेस नेते विजय बावणे व नितीन बावणे व इतर कार्यकर्त्यांनी भाजपा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या गाडीवर दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कोरपना येथील दगडफेक हि लोकशाहीला मारक असलेली घटना असून कॉंग्रेसच्या नेत्यांना अटक करावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी अशी माहिती आधार न्यूज नेटवर्क यांना दिली.


लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाहीत. हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी. दगडफेक हि लोकशाहीला मारक असलेली घटना आहे. असेही भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत