💻

💻

आरोपी विजय बावणे व पुत्राला अटक करा अन्यथा आंदोलनाचा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे ह्यांचा इशारा #chandrapur

कोरपना निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट.

कॉँग्रेस नेत्यांनी केली भाजपा जिल्हा महामंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक

कोरपना:- कोरपना नगर पंचायतीच्या निवडणुकीने शेवटच्या टप्प्यात हिंसक वळण घेतले असुन पराभव समोर दिसत असल्याने भांबावलेल्या काँग्रेस नेत्यांचा तोल ढासळत असुन पुरोगामी म्हणवून घेणार्‍या महाराष्ट्रात बिहारी प्रवृत्ती उदयास येत असल्याचे चित्र कोरपना नगर पंचायतीच्या निवडणुकीत दिसत आहे. ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला कॉँग्रेस नेते व तालुका कॉँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणवून घेणार्‍या विजय बावणे व त्यांचा मुलगा तसेच उमेदवार नितीन बावणे सोबत 30 ते 35 गुंडांनी भाजपा महामंत्री तसेच निवडणुक प्रभारी नामदेव डाहुले ह्यांच्या वाहनावर जबरदस्त दगडफेक करून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला असुन पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.कोरपना नगर पंचायत निवडणुकीत कॉँग्रेस विरूद्ध इतर सर्व पक्षांची आघाडी तयार करण्यात आली असुन विरोधी आघाडीला जनतेचा मिळणारा पाठींबा, निवडणुक प्रचारसभेला मिळालेला प्रतिसाद बघुन कॉँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याने कॉँग्रेस नेते गुंडगिरीवर उतरले असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केला.
यापूर्वीही विजय बावणे यांनी प्रचाराच्या दरम्यान अनेक भाजपा कार्यकर्त्याना प्रचारात फिरू नये अश्या धमक्या दिल्या, या धमक्याची ऑडियो क्लिप पोलीस विभागाला दाखवण्यात सुद्धा आली होती. घटना घडल्यावर गुन्हा दाखल करायला पोलिसांना तब्बल चार ते पाच तासाचा अवधी लागतो यावरून पोलीस विभागावर किती राजकीय दबाव आहे हे सुद्धा लक्ष्यात येते.
भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षातर्फे कोरपना पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल करण्यात आली असुन पोलिसांनी विजय बावणे व नितीन बावणे ह्यांच्या विरोधात १४३,१४७,३२३,३४१,४४७ अंतर्गत गुन्हे दाखल केले मात्र अजुनही आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. निवडणुकीचे वातावरण शांततापूर्ण राहावे व आदर्श आचारसंहितेचे पालन करत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी आरोपींना अटक होणे गरजेचे असुन दोन्ही आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे ह्यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत