पोंभूर्ण्यात ८० टक्के मतदान #election

Bhairav Diwase
३००९ मतदारानी बजावला आपला हक्क

१३ प्रभागातील ६१ उमेदवाराचे नशीब ईव्हीएममध्ये बंद
पोंभूर्णा:- पोंभूर्णा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक मंगळवारी शांततेत पार पडली. एकूण १३ प्रभागासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ३००९ मतदारांनी आपला हक्क बजावला. १३ प्रभागातील ६१ उमेदवार रिंगणात उभे होते. ६१ उमेदवाराचे नशीब आता ईव्हीएममध्ये बंद झाले आहेत.
१३ मतदान केंद्रे.....

पोंभूर्णा नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी ३००९ मतदारांनी आपल्या मतदानाचे कर्तव्य बजावले आहेत. ८०.१९ टक्के मतदान झाले आहे. सदर मतदान प्रक्रिया १३ केंद्रांवर पार पडली.
आठवडी बाजार बंद.....

पोंभूर्णा येथील आठवडी बाजार निवडणूकीमुळे मंगळवारला बंद ठेवण्यात आले होते. दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती.
पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी....

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनानी ७ अधिकारी १०० पोलिस कर्मचारी सज्ज होते. पोलिसांचा ताफा भरपूर प्रमाणात ठेवल्यामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडला नाही.