कबड्डी सामने पाहताना प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने २० प्रेक्षक जखमी #Injured

Bhairav Diwase
वरोरा तालुक्यातील घटना
वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात क्रीडा स्पर्धेची प्रेक्षक गॅलरी कोसळून 20 प्रेक्षक जखमी झाले आहेत. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
आज स्पर्धेला सुरुवात झाली. उदघाटन सत्रात तुडुंब भरलेल्या लाकडी प्रेक्षक गॅलरीला भार असह्य झाला आणि गॅलरी पत्त्यासारखी कोसळली. या वेळेस हजारो लोक यास्थळी उपस्थित होते. 
या घटनेत सुमारे 20 प्रेक्षक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बहुसंख्य अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील 7 जण गंभीर आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक काँग्रेस आमदार प्रतिभा बाळू धानोरकर यांच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जात होते. काही गंभीर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.