Top News

कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षकांचा स्टॅन्ड कोसळला #Kabaddi #warora #Chandrapur

खासदार व आमदारांनी जखमी रुग्णांची केली विचारपूस
वरोरा:- वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान कबड्डी सामने समाप्त झाल्यानंतर डीजे वर गीत सुरू होताच प्रेक्षकांनी या स्टॅंडवर नाचायला सुरुवात केली त्यामुळे या ठिकाणी असलेला स्टँड बॅनर बोर्ड सह खाली कोसळले यावर बरेच प्रेक्षक असल्याने किरकोळ व गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच लगेच जखमींना उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले. तर काहींना प्रायवेट दवाखान्यात दाखल करण्यात आले.

हे वृत्त माहीत होतात खासदार आणि आमदार यांनी थेट उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस करून घेतली. डॉक्टरांना भेट देऊन तात्काळ पाहणी करून जखमींना जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यासाठी ॲम्बुलन्सच्या व्यवस्था करून देण्यात आल्या. साधारणत 10 ते 12 प्रेक्षक जखमी झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वरोरा ठाणेदार खोब्रागडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून स्वतः खासदार जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पाहण्यासाठी दाखल झाले आहे. चंद्रपूरला तीन जखमींना हलवण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या सगळ्या घटनेचा आढावा खासदार बाळुभाऊ धानोरकर व त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर काळजीपूर्वक लक्ष देऊन करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने