सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी #Korpana

Bhairav Diwase
मुख्यमंत्र्यांना कोरपना तहसीलदारा मार्फत निवेदन.
कोरपना:- राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस निवडणुकीत निवडून आणण्यासाठी महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे. कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न केल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणून धमकावले जात आहे. राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहे हे योग्य नाही.सरकारी पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा त्वरित राजीनामा घ्यावा ही मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करीत आहोत.
राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार कोरपना मार्फत विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष व आमदार सुधीर मुनगंटीवार , माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजय धोटे , भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
यावेळी दिनेश सुर जिल्हा सचीव, दिनेश खडसे, अभय डोहे, आशिष देवतळे, शुभम झाडे अमोल खाडे आदीसह मोठ्या संख्येने भाजप युवा मोर्चा चे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी ऊर्जा मंत्र्याचा निषेध ही करण्यात आला.