२८ नग गोवंशसह एक कंटेनर असा ऐकून १७ लाख ८० हजारांचा माल जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगतसिंग वधावन, विरुर स्टेशन
विरुर स्टे:- आज दि . ०२ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन विरुरचे ठाणेदार राहुल चव्हाण यांना गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशन हद्दीमधील लक्कडकोट महामार्गवरील सोंडो गावाचे पुलीयाजवळ बॅरीकेटींग करून पोलिस कर्मचारी आणि पंचांसह नाकेबंदी केली असता गोपनिय माहितीप्रमाणे एक कंटेनर राजुरा कडुन लक्कडकोटकडे येत असतांना दिसल्याने त्यास पोलीसांनी अडवून कंटेनरची पंचांसमक्ष पाहणी केली असता सदर कंटेनर क्र. टिएस १२ युडी- ०५४९ मध्ये एकुण २८ नग जिवंत बैल जातीचे गोवंश निर्दयतेने डांबुन कत्तलीकरीता महाराष्ट्र सिमावर्ती भागातुन तेलंगाणा राज्यात कत्तलीकरीता घेवुन जात असता मिळुन आले.
यातील आरोपी नामे १) वसिम युनुस खान, वय ३५ वर्षे बल्लारपुर २) चालक जितीन केशु विजयन, वय ३० वर्षे, राहणार ईरूमतला, जिल्हा येरणागुंडम (केरळ), ३) मोबीन फकरुदीन शेख, वय- ३० वर्षे राहणार लक्कडकोट यांचे विरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. १९७६ चे कलम ५ (अ) (१) (५), ९, ११ व प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधि. १९६० चे कलम ११ (१) (ड) अन्वये सरतर्फे फिर्यादी नामे नापोकॉ. राहुल प्रभाकरराव सहारे यांचे कायदेशीर फिर्यादवरून गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. २,८०,०००/- २८ नग जिवंत बैल जातीचे गोवंश, १५,००,०००/- कंटेनर क्र . टिएस १२ युडी ०५४९ असा एकुण १७,८०,०००/- रुपयांचा माल जप्त करून ताब्यात घेतला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलिस हवालदार, दिवाकर पवार, राहुल सहारे, मय्या नरगेवार, पोशि. स्वप्नील चांदेकर, विजय मुडे, सुरेन्द्र काळे, अतुल शहारे, प्रल्हाद जाधव चालक नरेश शेन्डे यांनी केलेली असुन पुढील तपास ठाणेदार राहुल चव्हाण करीत आहे.#police