💻

💻

सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी #Pombhurna

मुख्यमंत्र्यांना पोंभूर्णा तहसीलदार मार्फत निवेदन
पोंभुर्णा:- राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस निवडणुकीत निवडून आणण्यासाठी महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे. कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न केल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणून धमकावले जात आहे. राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहे हे योग्य नाही. सरकारी पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा त्वरित राजीनामा घ्यावा ही मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे तहसीलदार पोंभूर्णा यांच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चा पोंभूर्णा च्या वतीने करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत