उपक्रमशील शिक्षिकांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय संमेलन संपन्न #Rajura

Bhairav Diwase
संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

राजुरा:- राज्यातील उपक्रमशील शिक्षिकांचे 25 आणि 26 डिसेंबर ला शेगाव येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय संमेलन संपन्न झाले. या संमेलनात राज्यातील उपक्रमशील शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होत्या.
क्रिएटिव्ह टीचर्स ग्रुपच्या प्रमुख अलका धाडे यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. सुवर्णा कुलकर्णी यांनी प्रमुख सहाय्यकाची भूमिका पार पाडली. संमेलनाध्यक्ष डॉ. अर्चना आंबेकर तर स्वागताध्यक्ष डॉ. निर्मला जाधव ह्या उपस्थित होत्या. संमेलनात राज्यातील उपक्रमशील शिक्षिकांनी जागतिक महामारी कौरौना काळातील लॉकडाऊन मधे केलेल्या कार्याच्या लेखांचे पुस्तक "द क्रिएटिव्ह लॉकडाऊन" चे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षिकांनी नवौपक्रम राबविण्याचा मानस बोलून दाखविला.
दोन दिवस चाललेल्या या संमेलनात राज्यातील विविध भागातून आवर्जून उपस्थित असलेल्या शिक्षिकांना सन्मानित करण्यात आले. सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षिकांमधे करुणा गुरव, प्रिया सुरवसे, कल्पना घाडगे, मोहिनी शिंदे, वर्षाराणी सरवदे, अश्विनी अहीरकर, विजया तडस, प्रतिभा हस्ते, अनुराधा डोंगे, वर्षा ढवळे, कविता महाले, रेखा सोलंके, उर्मिला शेळके, शोभा वारकर, जयश्री कठालकर, वैशाली ताजणे, माला गचके, अनुजा महाजन, दीपाली बाभूलकर, अर्चना थेरोकर, पल्लवी धाडे यांचा समावेश आहे.
संमेलनात परिसंवाद, नवोपक्रमशीलता, शब्द माझ्या मनातले या आणि अशा अनेक शैक्षणिक विषयांवर विचारमंथन करण्यात आले. सुवर्णा कुलकर्णी आणि जयश्री कठालकर यांनी संचालनाची धुरा सांभाळली तर उर्मिला शेळके व अनुजा महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.