जि. प. जनसुविधा योजना निधी अंतर्गत गोयगाव येथे ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन सोहळा संपन्न #Rajura

Bhairav Diwase

जि. प. सभापती सुनिल उरकुडे यांच्या हस्ते उद्घाटन

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील गोयगाव येथील नागरिकांनी जि. प. चंद्रपूर चे कृषी व पशुसंवर्धन सभापती यांना गावामध्ये ग्रामपंचायत भवनाच्या निर्मिती करीता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर दिलेला शब्द पूर्ण करत गोयगाव येथे जिल्हा (जनसुविधा योजना) अंतर्गत २२ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला.
  आज दि ०७/१२/२१ ला ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्न करू असे आश्वासन सभापती उरकुडे यांनी दिले. तसेच गावामध्ये ग्रामपंचायत भवन निर्मिती करीता निधी उपलब्ध केल्याबद्दल गोयगाव येथील नागरिकांनी आभार मानले.
  उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून जि. प. सभापती सुनिल उरकुडे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी किरण धनवडे, गोयगाव च्या सरपंच्या अनिता टेकाम, उपसरपंच रवींद्र जेनेकर, ग्रा.प.सदस्य संजीवनी कोडापे, मनोज बोबडे, बंडूभाऊ कोडापे, विस्तार अधिकारी रत्नपारखी साहेब, मारोती सातपुते, मधुकर कुचंकर आदींची उपस्थिती होती.