Top News

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती विषयावर इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे सरांचे मार्गदर्शन #Saoli #saolinews #Chandrapur

पोलीस स्टेशन पाथरी येथे निःशुल्क मार्गदर्शन शिबिर संपन्न 
सावली:- दिनांक 03/12/2021 रोजी पोलीस स्टेशन पाथरी, ता. सावली जि. चंद्रपूर येथे अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे संकल्पनेतून ग्रामीण भागातील युवकांना पोलीस भरती बाबत माहिती व्हावी या उद्देशाने तसेच राजा पवार, उप- विभागीय पोलीस अधिकारी, मूल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पाथरी पोलीस स्टेशन हद्दीत स्पर्धा परीक्षेच्या विषयावर निःशुल्क मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले.
युवकांना स्पर्धा परीक्षा, पोलीस, एस आर पी एफ, मिलिटरी भरतीच्या तयारी (Upsc mpsc, RRB, सरळसेवा, SSC, इत्यादी) अनुषंगाने लेखी व फिजिकल परीक्षा बाबत मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्यात आले.
तसेच उपस्थित युवकांना लेखी व फिजिकल परीक्षा बाबत माहिती देण्यासाठी इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे संस्थापक उडान अकॅडमी चंद्रपूर, ऑल इंडिया म्यॅरेथॉन प्लेअर महेश वाढई यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही उपस्थित युवकांना भरतीबाबत मार्गदर्शन केले.
इंजि. पिंपळशेंडे सरांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आजकाल बहूतेक पदवीधर तरुण-तरुणी नावलौकिक वा नोकरीच्या शाश्वतीमुळे (job security) स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसतात. पार अगदी खेड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत स्पर्धा परीक्षांचे वारे घुमत आहेत. स्पर्धा परीक्षा ज्याला आपण इंग्रजीमध्ये competitive exam म्हणतो. स्पर्धा परीक्षा घेण्याचे एक मुख्य कारण म्हणजे “नोकरभरती” होय. सरकारच्या विविध विभागांमध्ये काम करण्यासाठी मनुष्य बळाची गरज असते. असे आपल्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन पाथरी येथे बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार शेवाळे पोलीस स्टेशन पाथरी, पोलीस उप. निरिक्षक मधुकर सामलवार, नाईक पोलीस अंमलदार नारायण येगेवार, पोलीस अंमलदार सुरज शेडमाके, प्यारेलाल देव्हारे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने