Top News

विरुरचे ठाणेदार बनले देवदूत #Rajura

"त्या" भिक्षेकरीला मिळाले नवरूप.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- मागील अनेक वर्षांपासून लोकांनी दिलेल्या भिक्षावर जगणाऱ्या निराधार असलेला गणराज भोला माधव यांच्यावर विरुर पोलीस ठाणेदार देवदूत म्हणून पावन झाले आणि त्याला जीवन जगण्याचा मार्गच दाखविला. ग्रामस्थही ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या या समाजसेवेचे कार्य पाहून कौतुकाचा वर्षाव करीत आहे.
राजुरा तालुक्यातील विरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कविटपेठ येथील मंदिरासमोर मागील काही वर्षांपासून 75 वर्षीय गणराज भोला माधव हा लोकांनी दिलेल्या भिक्षेवर जीवन जगत आहे त्याचा मूळ गाव कोणता? तो इथे कसे आला? याची माहिती नाही. तो निराधार तथा विचारपूस करणारे कुणीही नसल्याने घाणेरडे कपडे, दाढी मिशी वाढलेली, वयोमानानुसार परवलंबी झाला होता.
दरम्यान विरुर पोलीस ठाण्यात नव्याने बदलून आलेले ठाणेदार राहुल चव्हाण हे आपल्या पोलीस कर्मचारी सोबत गस्तीवर गेले असता या निराधार भिक्षेकरी दिसला आणि मनातील समाजसेवा जागृत झाली जवळ जाऊन काळजीने विचारपूस केली वाढलेले केस आणि शरीरावरील कपडे पाहताच लगेच नाव्ह्याला बोलावून त्याची दाढी कटिंग करवून घेतली एका शिपायाने नळाचे पाण्याने आंघोळ घातली आणि ठाणेदारांनी सोबत आणलेले नवीन कपडे त्याला घालायला दिले.
तसेच एक महिन्याचे उदारनिवार्ह साठी अन्न धान्य दिले. तसेच कुणीही याला त्रास देऊ नये म्हणून स्थानिक नागरिकांना सूचना केल्या आणि लगेच स्वच्छता होताच त्या निराधार भिक्षेकरीचे रूप बदलले एक चांगला देखणा रूप उजेळात आले. ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या या मानवीय दृष्टिकोन बाबत चर्चेचा विषय बनला असून ठाणेदार सोबत सर्व पोलीस कर्मचार्याचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने