एकाच रात्री एक दुकान तर दुसरे मंदिराचे कुलूप फोडले
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या माता मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रात्रीचा फायदा घेत एका नामवन्त दुकानावर डल्ला मारला चोरांनी तोडलेल्या कुलुपला लांवण्यात आलेल्या रॉड ला मात्र काही अंतरावरच सोडले दुकानाच्या बाहेर लावलेल्या लाईट चे वायर तोडून लाईट बंद करण्यात आले नंतर लोखंडी रॉड ने कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला दुकानातील पैस्यांचा गल्ला व चिल्लर खुरदा चा डब्बाच घेऊन पोबारा केला.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माता मंदिर जवळील सुभाष किराणा दुकान हे अत्यन्त वर्दळीच्या ठिकाणी आहे समोर यवतमाळ को ऑपरेटिव्ह बँक बाजूला डॉ धोटे यांचा दवाखाना असून ते प्रतिष्टीत व्यापाऱ्या पैकी एक आहे रात्रीचा फायदा घेत चोरांनी सुभाष किराणा दुकान फोडले एक महिन्याच्या आत ही तिसरी घटना असून पोलीस प्रशासन मात्र सुस्त आहे या घटनेवरून व्यापाऱ्यांनी पोलिसांनि रात्रीची गस्त वाढवावी असे बोलल्या जात आहे
कन्यका मंदिरातील मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडले मात्र आत मधून दाराला लॉक असल्यामुळे ते उघडू शकले नाही तरी पण मोठी चोरी होण्याची घटना टळली
या घटनेमुळे व्यापर्यात कमालीची दहशत पसरली असून चोरांना पकडून काढण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली बातमी लिहे पर्यंत पोलीस विभागाने पंचनामा ला सुरवात केली पण ठाणेदार घटनास्थळी दाखल व्हायचे होते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत