जाहिरात... Advertisement... विज्ञापन

तीन‌ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदार अडकला ACB च्या जाळ्यात #ACB
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- आवाळपुर पोलीस चौकी, पो.स्टे. गडचांदुर, येथील पोलीस हवालदार सुनिल मुकुंदराव मेश्राम, वय ५० वर्ष यांस तीन हजार रूपये लाच रक्कम स्वीकारतांना लाच लुचपथ प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे नांदा फाटा, गडचांदुर ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असुन त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. तकारदार यांचेवर पोलीस स्टेशन गडचांदुर, जिल्हा चंद्रपूर येथे सट्टापट्टीचा जुगार खेळल्याबाबत अपराध क. ३२३/२०२१ दिनांक १४/०९/२०२१ रोजी गुन्हा दाखल असुन त्यामध्ये त्यांचेवर आवाळपुर पोलीस चौकी, पोलीस स्टेशन गडचांदूर येथील पोलीसांनी कारवाई करून त्यांना जामीनावर मुक्त केले आहे.

सदर गुन्हयाचे तपासकामी आवाळपुर पोलीस चौकी, पो.स्टे. गडचांदुर येथील पोलीस हवालदार सुनिल मेश्राम यांनी तक्रारदार यांचा मोबाईल ताब्यात घेतला होता. सदर मोबाईल परत देण्याचे कामाकरीता पोलीस हवालदार सुनिल मेश्राम यांनी तक्रारदार यांना ५०००/- रू. ची मागणी केली. तक्रारदार यांना पोलीस हवालदार सुनील मेश्राम यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि. चंद्रपूर येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली.

तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीप्रमाणे श्रीमती शिल्पा भरडे, पोलीस निरीक्षक यांनी गोपनीयरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये आवाळपुर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार सुनील मेश्राम, पो.स्टे. गडचांदुर, जिल्हा चंद्रपूर यांनी तकारदार यांना गुन्हयाचे तपासात ताब्यात असलेला मोबाईल परत करण्याकरीता ५०००/- रूपये लाच रक्कमेची मागणी करन तडजोडीअंती ३०००/- रूपये लाच रक्कम दिनांक ०३/१२/२०२१ रोजी गडचांदुर येथील नायरा पेट्रोल पंपासमोरील शुनका भाकर दुकाना समोरील रोडवर स्वतः स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून त्यांचे विरूध्द पो.स्टे. गडचांदूर, जि. चंद्रपूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर,. मिलींद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, ला.प्र.वि., चंद्रपूर याचे मार्गदर्शनात, श्रीमती शिल्पा भरडे, पोलीस निरीक्षक, नापोशि नरेशकुमार ननावरे, पोशि रोशन चांदकर, रवी ढंगळे, वैभव गाडगे, चालक पोशि रमेश हाके सर्व ला प्र वि. चंद्रपूर यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत