Click Here...👇👇👇

महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने व निवेदन #Saoli

Bhairav Diwase
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- भारतीय जनता पार्टी तालुका सावली व भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने व निवेदन देण्यात आले यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक 6 डिसेंबर 2021 ला जो राज्य शासनाने राजकीय ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वाचविण्यासाठी जो अध्यादेश सरकारने काढला होता तो ओबीसी समाजा ला भूलथापा देण्यासाठी काढलेला आदेश मानसर्वोच्च न्यायालयाने आदेश रद्द केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण संपुष्टात आलं.
यामुळे सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका मधील ओबीसीचे या जागांवरील निवडणूक सध्या थांबवण्यात आल्या या निवडणुका थांबल्यामुळे ओबीसी समाजातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात फार मोठा आक्रोश निर्माण झाला आहे त्यामुळे या निवडणुका जोपर्यंत ओबीसी तर राजकीय आरक्षण पूर्णत्व लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी घेऊन भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी तहसीलदार मार्फत राज्याचे महामहिम राज्यपाल यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
यावेळी अविनाश पाल जिल्हाध्यक्ष. भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपर तथा तालुकाध्यक्ष भाजपा सावली, सतीश बोमावार महामंत्री, संतोषभाऊ तंगडपलीवार जि. प. सदस्य, अर्जुनभाऊ भोयर, कविंद्र रोहनकर देवराव सा. मुद्दमवार, अरुन पाल, दिवाकर गेडाम, विनोद धोटे, किशोर वाकुडकर, मनोहर कुकडे, कृष्णाभाऊ राऊत, प्रकाश पा. गड्डमवार, गिरीश चिमुरकर, अंकुश भोपये, राकेश गोलेपलीवार, शोभाताई बाबनवाडे, प्रतिभाताई बोबाटे, निखिल सुरमवार. निलिमा सुरमवार, नंदकिशोर संतोषवार, मोनिका शिंदे, सिंदुताई गेडाम, तुळशीदास भुरसे, सुदाम राऊत तुकाराम कोंडेकर, प्रकाश ठिकरे, अंबादास प्रधान, प्रविन झोडे, अशोक पाल, शरद ठुसे. आदी उपस्थित होते.